Dukes Nose Trek | 16 वर्षाच्या मुलीने केली नानाचा अंगठा या सुळक्यावर यशस्वी चढाई !; पाहा व्हिडीओ
शिवाजीनगर गावठाण पुणे येथील राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉलच्या दोन विद्यार्थ्यांनी नानाचा अंगठा या सुळक्यावर यशस्वी चढाई केली. योगेश वीरकर (वय २६) आणि सानिया शेख (वय १६) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. प्रशिक्षक अमोल जोगदंड, मानतू मंत्री, आणि इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी ही चढाई फक्त ३ तासात पूर्ण केली.
पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाट परिसरातील नानाचा अंगठा ४५० फूट उंच आहे. तेथे वारा हा जवळजवळ ताशी ८० किमी वेगाने वाहतो. सानिया शेख आणि योगेश वीरकर यांनी ही चढाई ४ स्टेशन्स मध्ये पूर्ण केली. हा अनुभव खूप थरारक होता कारण सानिया शेख हिने सह्याद्री मध्ये प्रथमच अशी चढाई केली. योगेश वीरकर याने याआधी सह्याद्रीमध्ये तैल बैल, वानरलिंगी, ड्युक्स नोझ (नागफणी), बाण सुळका अश्या अनेक साहसी चढाया केलेल्या आहेत.
#trekking #dukesnose #maharashtra #malshejghat